सांग तरी मला की किती वेळ लागेल तुला हे कळायला
Thursday, 31 December 2015
Wednesday, 30 December 2015
कविता # १८
तू सोबत असताना चोरून पाहणाऱ्या डोळ्यांना आवरण्या त्यांना मिटतो
पण काय करू डोळेही फितूर आहेत, मिटल्यावर पण तुझाच चेहरा दिसतो
पण काय करू डोळेही फितूर आहेत, मिटल्यावर पण तुझाच चेहरा दिसतो
Tuesday, 29 December 2015
कविता # १७
प्रेमाने मनाला स्पर्ष करून काटा ऊभारणारा थंडगार वारा तू
बेफाम लाटांना भेटीची आस लावणारा सुंदर किनारा तू
बेफाम लाटांना भेटीची आस लावणारा सुंदर किनारा तू
कविता # १६
हृदयावर पडतील घाव अशी जखम मी तूला कधीच देणार नाही
प्रयत्न करेन मी नेहमीच की या सुंदर डोळ्यांत कधीच अश्रू येणार नाही
प्रयत्न करेन मी नेहमीच की या सुंदर डोळ्यांत कधीच अश्रू येणार नाही
Friday, 11 December 2015
कविता # १५
रोज तू मला प्रश्न विचारते की तुला कोण आवडते
आता खरं कसं सांगू मी तुला की मला तुच आवडते
भिती वाटते सर्व तुला माझ्या मनातलं सांगण्याची
तूही सोडशील साथ, तुझ्याविना पुन्हा एकटे पडण्याची
आता खरं कसं सांगू मी तुला की मला तुच आवडते
भिती वाटते सर्व तुला माझ्या मनातलं सांगण्याची
तूही सोडशील साथ, तुझ्याविना पुन्हा एकटे पडण्याची
कविता # १४
नजरेला ही पुन्हा वळावे लागेल असे काहीतरी करून जा
हलकेच श्वासात येऊनी माझ्या हृदयाला तू चोरून जा
हलकेच श्वासात येऊनी माझ्या हृदयाला तू चोरून जा
Wednesday, 9 December 2015
कविता # १३
ताऱ्यांचे तुटणेही आता बंद झाले आहे
मी नेहमी तुलाच मागतो हे आता त्यांनाही माहित झाले आहे...
Wednesday, 21 October 2015
२ ओळी # १
तू सोबत नसली तरी हृदयाचे धडधडणे थांबणार नाही. पण तू सोबत असताना ज्या तालात धडधडते तो ताल त्या हृदयाला गवसणार नाही.
कविता # ८
तुझ्यावर कविता करणे हा माझा आवडता छंद आहे
सुचलेल्या माझ्या प्रत्येक कवितेत तुझ्याच प्रेमाचा गंध आहे
Saturday, 22 August 2015
कविता # ७
सांगत का नाही मी तुला की प्रेम फक्त तुझ्यावरच करतो.
दिवसरात्र प्रत्येक क्षणाला हा जीव तुझ्यासाठीच झुरतो.
Sunday, 19 July 2015
Saturday, 18 July 2015
कविता # ५
चांदण्यांनी भरलेल्या रात्रीला आहे चंद्राची साथ
आवडेल मला फिरायला या रात्री हातात धरुन तिचा हात
कविता # ४
रात्र झाली की माझे मन विसरते स्वतःला आठवणींच्या समुद्रात वाहून
चंद्र सुद्धा विसरतो त्याच्या चांदण्यांना तिचे मोहक रुप पाहून
Wednesday, 15 July 2015
कविता # २
प्रेम केल्याशिवाय प्रेमाची व्याख्या कळत कधीच नाही
खरे प्रेम कुणावर केले असेल तर त्या व्यक्तीशिवाय आणखी कुठेही नजर वळत नाही
खरे प्रेम कुणावर केले असेल तर त्या व्यक्तीशिवाय आणखी कुठेही नजर वळत नाही
Tuesday, 14 July 2015
Subscribe to:
Posts (Atom)