Saturday, 13 May 2017

पुन्हा आला पाऊस #१०

पुन्हा आला पाऊस, चिंब भिजलं मन अन् कविता सुचू लागली
पाऊस पडण्याचा थांबला, पण कविता करण्यात अख्खी रात्र जागली

पुन्हा आला पाऊस #९

पुन्हा आला पाऊस अलगदच पडल्या सरी
पाऊस झाला सुरू पण राहिली कुठे माझी परी

पुन्हा आला पाऊस #८

पुन्हा आला पाऊस पाऊलखुणा तुडवण्या
काठांवरच्या अश्रूंना पुन्हा डोळ्यांतच बुडवण्या

पुन्हा आला पाऊस #७

पुन्हा आला पाऊस शहारलं हे मन
चिंब भिजूनी सरींनी बहरलं हे तन

पुन्हा आला पाऊस #६

पुन्हा आला पाऊस, गारठली सारी सृष्टी
मी ही थंड पडलो, पडता तिच्यावर दृष्टी

पुन्हा आला पाऊस #५

पुन्हा आला पाऊस अन् भिजून गेले सारे रस्ते
मजा येते भिजण्या अश्यावेळी जेव्हा तू सोबत असते

पुन्हा आला पाऊस #४

पुन्हा आला पाऊस घेऊन आला गारवा
नयनरम्य निसर्ग नटला उधळूनी रंग हिरवा

पुन्हा आला पाऊस #३

पुन्हा आला पाऊस भिजून पाने सळसळली
मला होणाऱ्या विरहानेच कदाचित हळहळली

पुन्हा आला पाऊस #२

पुन्हा आला पाऊस टिप टिप थेंब हे बरसले
नकळतच डोळ्यांतून तुला भेटण्या तरसले

पुन्हा आला पाऊस #१

पुन्हा आला पाऊस न्हाऊन निघाली धरती
कविता लिहिल्या आज पुन्हा मी तिच्यावरती

Friday, 12 May 2017

कविता #१०४

माझं तुझ्यावर प्रेम आहे बोलायला किती सोपं असतं पण असं बोलून प्रेम होत नसतं
सात जन्म निभवता नाही आलं तरी चालेल पण या जन्मी तरी निभवायचं असतं

कविता #१०३

पहिलं प्रेम तर फसलं होतं, म्हणूनच पुन्हा एकदा प्रेमात पडायचं होतं
जिंकण्याची खात्री होती म्हणूनच यावेळी नशिबाला हरवायचं होतं

कविता #१०२

प्रेम तर आपोआपच होत असतं
जेव्हा कोणीतरी आवडीचं होत असतं

कविता #१०१

तुला पाहिलं की हृदय एका वेगळ्याच लयीत धडधडतं
न जाणे मनातल्या मनात किती शब्द ते बडबडतं

कविता #१००

तु जेव्हा जेव्हा हसतेस प्रत्येकवेळा मला कोड्यात पाडतेस
कोडं सोडवायचं राहून जातं पण मला एका वेगळ्या विश्वात धाडतेस

कविता #९९

प्रेमात आहोत आपण एक लाजवणारी स्माईल तरी दे
जास्त काही मागत नाही खळखळून हसत मिठीत तरी ये

कविता #९८

डोळे मिचकावून पाहताना तू खरंच खूप छान दिसतेस
हसतेस जेव्हा गाली खळी ठेवता पुन्हा मला प्रेमात पाडतेस

कविता #९७

कथांमध्ये ऐकलेल्या पऱ्यांप्रमाणेच ती एक परी होती
म्हणूनच कदाचित ती माझ्या आयुष्यात नव्हती

कविता #९६

रात्र होती नकळत ओलावलेल्या पापण्यांची
आस होती एकच की ही रात्रीच्या संपण्याची

कविता #९५

पहिलं प्रेम विसरावं म्हणून पुन्हा एकदा प्रेमात पडलो
नशिबापुढे कोण जिंकतं या वेळीही मी पुन्हा हरलो

कविता #९४

प्रेमाची खरी सुरूवात तर मैत्रीमधूनच होते
पण एका वळणावर अनोळखी होऊन संपते

कविता #९३

शब्द नेहमीचेच असले तरी ओळी नवीन बनत असतात
एक दिवस काही लिहिलं नाही तर माझ्याशी ते रूसून बसतात

कविता #९२

दुःख आहे तुला खूप, पण कोणालाही का नाही दाखवत
सारं गिळून नेहमी हसत रहातोस हेच फक्त नाही पहावत

कविता #९०

माझं प्रेम तिच्यावर आहे, तिचं कुणा दुसऱ्यावर आहे
जे हवं ते क्वचितच मिळतं हीच जीवनाची रीत आहे

कविता #९०

माझं प्रेम तिच्यावर आहे, तिचं कुणा दुसऱ्यावर आहे
जे हवं ते क्वचितच मिळतं हीच जीवनाची रीत आहे

कविता #९१

हरवलेल्या या डोळ्यांमध्ये चेहरा एक खास आहे
हजारवेळा समजवलेल्या मनाला तरीही तुझीच आस आहे

कविता #८९

झोपतो मी हल्ली लवकर कारण रोज तुझी स्वप्ने पडतात
स्वप्न संपवावं असं वाटत नाही पण घड्याळाचे काटे पळतात

कविता #८८

डोळे झाकण्याच्या प्रयत्न केला तरी डोळ्यांसमोर येतेच
ती स्वतः मस्त झोपते पण सतत येऊन माझी झोप उडवते

कविता #८७

कायम मनात दडलेलं असतं असं असतं पहिलं प्रेम
म्हणूनच म्हणतात की पहिलं प्रेम विसरता येत नाही
आता मी दुसऱ्या कुणावर तरी प्रेम करतो
अन् तिला पहिल्यानंतर दुसरा काही पर्यायच उरत नाही

दुसरी कुणीतरी आवडते म्हणजे पहिलं प्रेम खोटं नसतं
वेळेसोबत आता आपणही पुढे जाऊ लागतो
आपण लपवत असतो पण प्रेम अजुनही थोडंसं असतं
नव्या साथीदारासोबत आपण आता रमू लागतो

कविता #८६

प्रेम काही सोपा शब्द नाही आहे कोणालाही समजायला
अनेकांचं अख्खं आयुष्य जातं ह्या एका शब्दाचा अर्थ उमजायला

Wednesday, 3 May 2017

कविता #८५

आठवणी आल्याच नसत्या जर विसरणं सोपं असतं
घाव नसते झाले हृदयावर जर मन प्रेमात पडलंच नसतं

कविता #८४

रोज तुला सांगण्याचा विचार मी करतो
पण कसं सांगायचं तेच मला समजत नाही
एकतर्फी प्रेम आहे माझं म्हणूनच असेल असं
शब्द ओठांवर असूनही मला बोलता येत नाही