आठवणींच्या व्यतिरिक्त त्यांनी अजून काही नाही दिलं
Friday, 8 September 2017
कविता #१०५
आठवणींच्या व्यतिरिक्त त्यांनी अजून काही नाही दिलं
कविता #१०८
पाहता तुला, मनी उठती शहारे
वेड लावती, हे नजरेचे इशारे
स्तब्ध राहिले होते, आताच सारे
तूला पाहिले, अन् उनाडले वारे
Monday, 12 June 2017
एक अनपेक्षित भेट
निळाईच्या रंगात सजत चाललेली सांज अशी
सुर्याला क्षितिजाची ओढ लावणारी आस तशी
ती येणार नसते, पण तरीही मनाला एक वेडी आस असते
घड्याळ्याच्या टिकटिक आवाजासोबतच वेळ सरत असते
ती का येईल, खरं तर मित्र भेटायला येणार असतो
तरी काल्पनिक जगात अडकून मी मात्र हसत असतो
मित्र यायला उशीर करतो आणि विचारचक्र मनात सुरू करतो
प्रत्येक क्षण जात असतो आणि आठवणींना आणत असतो
एकट्यात असताना प्रत्येक क्षण तासासारखा भासतो
का उगाच आस लावूनी काळ मला पाहून हासतो
तितक्यात एक फोन येतो, क्षणभरासाठी सुखावतो
सततच्या येरझारा घालण्याने पायही दुखू लागतो
फोनवर बोलत असताना अचानकच नजर मागे वळते
आणि वळताना ती अचानकच डोळ्यासमोर दिसते
तिला पाहताच मन एका वेगळ्या विश्वात जातं
आणि मग पुढचे काही क्षण गोंधळलेल्या अवस्थेत राहतं
काही समजण्यापुर्वीच ती नजरेआड झालेली असते
पाहता चोहिकडे ती मला मग कुठेच दिसत नसते
आठवणींत तू आहेस अजूनही जरी इतकी वर्षे सरली
अविस्मरणीय क्षणांची जागा तुझ्या आठवणींनीच भरली
तुला पुन्हा पाहिलं तेव्हा वाटलं जणू झाला असेल भास
कारण फक्त तूच आहेस या हृदयासाठी अजूनही खास
पहिलं प्रेम असतंच असं काही केल्या न विसरता येणारं
देवाकडे न मागताही हसण्याचं एक विचित्र कारण देणार
Saturday, 13 May 2017
पुन्हा आला पाऊस #१०
पुन्हा आला पाऊस, चिंब भिजलं मन अन् कविता सुचू लागली
पाऊस पडण्याचा थांबला, पण कविता करण्यात अख्खी रात्र जागली
पुन्हा आला पाऊस #५
पुन्हा आला पाऊस अन् भिजून गेले सारे रस्ते
मजा येते भिजण्या अश्यावेळी जेव्हा तू सोबत असते
Friday, 12 May 2017
कविता #१०४
माझं तुझ्यावर प्रेम आहे बोलायला किती सोपं असतं पण असं बोलून प्रेम होत नसतं
सात जन्म निभवता नाही आलं तरी चालेल पण या जन्मी तरी निभवायचं असतं
कविता #१०३
पहिलं प्रेम तर फसलं होतं, म्हणूनच पुन्हा एकदा प्रेमात पडायचं होतं
जिंकण्याची खात्री होती म्हणूनच यावेळी नशिबाला हरवायचं होतं
कविता #१००
तु जेव्हा जेव्हा हसतेस प्रत्येकवेळा मला कोड्यात पाडतेस
कोडं सोडवायचं राहून जातं पण मला एका वेगळ्या विश्वात धाडतेस
कविता #९८
डोळे मिचकावून पाहताना तू खरंच खूप छान दिसतेस
हसतेस जेव्हा गाली खळी ठेवता पुन्हा मला प्रेमात पाडतेस
कविता #९५
पहिलं प्रेम विसरावं म्हणून पुन्हा एकदा प्रेमात पडलो
नशिबापुढे कोण जिंकतं या वेळीही मी पुन्हा हरलो
कविता #९३
शब्द नेहमीचेच असले तरी ओळी नवीन बनत असतात
एक दिवस काही लिहिलं नाही तर माझ्याशी ते रूसून बसतात
कविता #९२
दुःख आहे तुला खूप, पण कोणालाही का नाही दाखवत
सारं गिळून नेहमी हसत रहातोस हेच फक्त नाही पहावत
कविता #९०
माझं प्रेम तिच्यावर आहे, तिचं कुणा दुसऱ्यावर आहे
जे हवं ते क्वचितच मिळतं हीच जीवनाची रीत आहे
कविता #९०
माझं प्रेम तिच्यावर आहे, तिचं कुणा दुसऱ्यावर आहे
जे हवं ते क्वचितच मिळतं हीच जीवनाची रीत आहे
कविता #८९
झोपतो मी हल्ली लवकर कारण रोज तुझी स्वप्ने पडतात
स्वप्न संपवावं असं वाटत नाही पण घड्याळाचे काटे पळतात
कविता #८८
डोळे झाकण्याच्या प्रयत्न केला तरी डोळ्यांसमोर येतेच
ती स्वतः मस्त झोपते पण सतत येऊन माझी झोप उडवते
कविता #८७
कायम मनात दडलेलं असतं असं असतं पहिलं प्रेम
म्हणूनच म्हणतात की पहिलं प्रेम विसरता येत नाही
आता मी दुसऱ्या कुणावर तरी प्रेम करतो
अन् तिला पहिल्यानंतर दुसरा काही पर्यायच उरत नाही
दुसरी कुणीतरी आवडते म्हणजे पहिलं प्रेम खोटं नसतं
वेळेसोबत आता आपणही पुढे जाऊ लागतो
आपण लपवत असतो पण प्रेम अजुनही थोडंसं असतं
नव्या साथीदारासोबत आपण आता रमू लागतो
कविता #८६
प्रेम काही सोपा शब्द नाही आहे कोणालाही समजायला
अनेकांचं अख्खं आयुष्य जातं ह्या एका शब्दाचा अर्थ उमजायला