Monday, 12 December 2016

कविता #८३

सांगायचं असतं खूप काही, पण सांगायचं राहून जातं
बोलण्यासारखंही खूप काही असतं, पण आयुष्यच संपून जातं

Thursday, 6 October 2016

कविता #८१

तिच्यात नक्कीच काहीतरी जादू आहे खास
तिच्या आसपास असण्याचेच हल्ली होतात भास

Tuesday, 4 October 2016

कविता #८०

तिच्यामुळे आज पुन्हा एकदा नेहमीपेक्षा जास्तच हसलो
हसता हसता आज पुन्हा एकदा मी तिच्या प्रेमात फसलो

Saturday, 1 October 2016

कविता #७९

तिच्यासोबत घालवलेला एक एक क्षण पुनःपुन्हा आठवतोय
आठवणींच्या कोपऱ्यामध्येच त्या प्रत्येक क्षणाला साठवतोय

Thursday, 29 September 2016

कविता #७८

बोलायला तर हजारो शब्द रोज सुचतात
पण तिला समोर पाहून ते सर्व फिके पडतात

Tuesday, 27 September 2016

कविता #७७

कोण म्हणतो की मन लपवू शकतं पण डोळे खरे असतात
दुराव्याचे अश्रू कितीही असले तरीही ते हसतानाच दिसतात

Monday, 26 September 2016

कविता #७६

पुनःपुन्हा पाहण्या तुला मन हे अधीर होते
तुझ्यासोबत बोलताना नक्कीच हे बधीर होते

Monday, 19 September 2016

कविता #७५

लिहितो आहे मी सकाळपासून खूप पण लिहिणे संपत नाही
केलीस माझ्यावर जादू तू आता मला काहीच सुचत नाही

Sunday, 18 September 2016

कविता #७४

इतके दिवस लिहीतच होतो कविता पण सुचतच नव्हतं चांगलं काही
तुला आज पुन्हा पाहिल्यावर लिहिण्यावाचून राहिलंच नाही

Friday, 16 September 2016

कविता #७३

आज खूप दिवसानंतर पाहिलं तिला मी पुन्हा हसताना
चोरून अनेकदा तिलाच पाहिलं कोणाचं लक्ष नसताना

Sunday, 4 September 2016

कविता #७२

तुझ्या प्रेमात पडायचं की नाही हे माझ्या हातात नव्हतं
पण तूला विसरणं तर नक्कीच माझ्या हातात होतं
आठवणींतून तुला काढणं फार सोपं काम नव्हतं
कारण तुझं नावच माझ्या प्रत्येक श्वासात होतं
 

Saturday, 3 September 2016

कविता #७१

ती मला अनेकवेळा प्रश्न विचारते कोण आवडली का finally...
इतकी रात्र झाली तरी तू नेहमीच online असतो...
तिचं माझ्यावर लक्ष तर आहे पण मी तिला सांगू तरी कसं..
तिने तो एकदा nice dp पाठवलेला message च मी पुन्हा पुन्हा वाचत बसतो...

Sunday, 21 August 2016

कविता # ७०

तुटणाऱ्या प्रत्येक ताऱ्याकडे तुलाच मागणार
डोळे मिटले की फक्त तुझाच चेहरा पाहणार
प्रेम तर मनापासून केलं आहे मी तुझ्यावर
शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुझाच राहणार

Thursday, 18 August 2016

कविता # ६९

प्रेम त्याचं आणि तिचं सर्वांपासून लपलेलं
जगाच्या भितीमुळे दोघांतच जपलेलं

Saturday, 13 August 2016

कविता # ६८

रात्र तर नेहमीच संपतच असते, पण संपत नाही तिची स्वप्नं पाहणं
डोळे जरी मिटले तरी संपतच नाही तिचं डोळ्यांसमोर येत राहणं

Wednesday, 10 August 2016

कविता # ६७

तुझ्या निरागस हास्यावरच हा जीव जडला आहे
तुझ्या श्वासांतच हा जीव अडकून पडला आहे

Monday, 8 August 2016

कविता # ६६

माहित नाही मला की दिवसातून किती वेळा तुझे नाव ओठांवर येते
दूर कितीही असली तरी हृदयात अजूनही आहेस ह्याचा दिलासा देते

Saturday, 6 August 2016

कविता # ६५

तुला मी कधीच आठवण्याचा प्रयत्न करत नाही
कारण तू आहेसच अशी कधीच विसरली जात नाही

Friday, 5 August 2016

कविता # ६४

बेहिशेबी प्रेम करण्यासाठी प्रेमळ हृदय असावं लागतं
इतकं प्रेम करूनही यातना मिळाल्या तरीही हसत रहावं लागतं 

Wednesday, 3 August 2016

कविता # ६३

तुला नाही पाहिलं असा एकही दिवस जात नाही
आणि तुला पाहिल्यानंतर आणखी कुठेच पहावलं जात नाही

Friday, 29 July 2016

कविता # ६२

काय जादू आहे तुझ्यात हे असे नेहमीच माझ्यासोबत घडते
तुला न पाहण्याचे ठरवूनही तुला पाहिले की पुन्हा तुझ्या प्रेमात पडते 

Thursday, 14 July 2016

कविता # ६१

तुझ्याविना आणखी कोणाला पहावलं जात नाही
तुझी आठवण काढल्याविना आता रहावत नाही

Tuesday, 12 July 2016

कविता # ६०

कविता ह्या का सुचतात अजूनही कळले नाही मला
बनवल्या जिच्यासाठी कधी पाठविल्याच नाही तिला

Sunday, 10 July 2016

कविता # ५९

का हे वेडं मन माझं प्रत्येक रात्री तुझं स्वप्न पाहतं
सकाळ ऊजाडते लवकर, आणि स्वप्न अधुरं रहातं

Thursday, 7 July 2016

कविता # ५८

तुझ्यासारख्या अजूनही मुली असतील या जगात
पण मला फक्त तूच पाहिजे बाकी सर्व गेल्या ढगात

Wednesday, 18 May 2016

कविता # ५७

तुला मी विसरलो आहे असं मी सर्वांना सांगतो
पण अजूनही रोज देवाकडे मी तुलाच मागतो

Tuesday, 17 May 2016

कविता # ५६

पुन्हा प्रेमात न पडण्या हृदयाला किती सावरावं लागतं
अजून कुठे लक्ष जाऊ नये म्हणून डोळ्यांनाच आवरावं लागतं

Saturday, 14 May 2016

कविता # ५५

माहित नाही मला की दिवसातून किती वेळा तुझे नाव ओठांवर येते
दूर कितीही असली तरी हृदयात अजूनही आहेस ह्याचा दिलासा देते

Thursday, 12 May 2016

कविता # ५४

तुझ्यासोबत बोलत असताना ओठांवर शब्द तर येतात पण त्यांना स्वरांची साथच मिळत नाही
का हे असे होते वेळोवेळी माझ्यासोबत या प्रश्नाचे उत्तर या हृदयाला अजूनही मिळत नाही

Monday, 9 May 2016

कविता # ५३

तुझ्याविना जीवन माझं नक्कीच संपणार नाही
पण माझ्याइतकं चांगलं तुला आणखी कोणीही नक्कीच जपणार नाही

Friday, 6 May 2016

कविता # ५२

काही नाही म्हणालो तरी डोळे पाहूनच तिला सर्व काही कळते
मी आठवण जरी काढली तिची तरी मला शोधण्यास नजर तिची वळते

Saturday, 30 April 2016

कविता # ५०

आज पुन्हा कविता लिहायला सुरूवात केली मी तुझ्या आठवणीत स्वतःला रमवून
समजलंच नाही मला की किती वेळ झाला आठवणींत होतो मी हरवून

Saturday, 30 January 2016

कविता # ४९

असावं सोबतीला कोणीतरी आपल्यामुळे हसणारं
प्रेमाच्या भावनेने का होईना पण हक्काने रूसणारं

Friday, 29 January 2016

कविता # ४८

पाहू नकोस या नजरेने प्रेमात पडशील
मलाही न सांगता हृदयात माझ्या दडशील

Thursday, 28 January 2016

कविता # ४७

तिला आठवणींतून विसरायला मी केले खुप प्रयत्न
पण सापडेल का शोधून तिच्यासारखे दुसरे रत्न

Wednesday, 27 January 2016

कविता # ४६

सोबत असताना या डोळ्यांना फक्त तिनेच दिसावं
मी अन् ती आणखी मग कोणीही या जगात नसावं

Tuesday, 26 January 2016

कविता # ४५

तुझ्याविना आणखी काही सुचतच नाही आता
रात्री सुद्धा देतेस साथ स्वप्नांमध्ये जाता

Monday, 25 January 2016

कविता # ४४

प्रेम कसं झालं हे खरंच कळलं नाही मला
बाकी सर्व गेल्या ऊडत, आजपासून पाहणार फक्त तूला

Sunday, 24 January 2016

कविता # ४३

बोलायचं असलं खूप काही तरीही मी काहीच बोलत नाही
मनाला कोंडतो हृदयात अन् हृदयाचं द्वार मग खोलतच नाही

Saturday, 23 January 2016

कविता # ४२

रोज मनात विचार येतो तुला कविता पाठविण्याचा
पण हृदयाने का आग्रह धरला आहे मनात साठविण्याचा

Friday, 22 January 2016

कविता # ४१

स्वप्नांनीही सवय लावून घेतली आहे तुझ्या आठवणीत रमण्याची
पण सुर्याला का आता आस लागली आहे ही सुंदर रात्र संपण्याची

Thursday, 21 January 2016

कविता # ४०

बोलताना तू माझ्यासोबत खूप कमी शब्दांत बोलतेस
पण त्या बोलण्यातच हळूच तू मनाचे द्वार खोलतेस

Wednesday, 20 January 2016

कविता # ३९

आठवण तुझी खूप येते तुझ्यापासून दूर जाता
डोळे आहेत आसुसलेले तुला पाहण्या आता

Tuesday, 19 January 2016

कविता # ३८

माझ्या हृदयाला माझ्या नकळतच तू चोरलंस
पण नंतर त्यावर तू तुझं नाव का कोरलंस

Monday, 18 January 2016

कविता # ३७

तुला पाहिलं की कठीण होतं हृदयाला सावरणं
त्याहूनही कठीण होतं या भाबड्या मनाला आवरणं

Sunday, 17 January 2016

कविता # ३६

तुला पाहिल्यापासून मला कविता सुचायला लागल्या आहेत
तुझ्यावर कविता करण्यातच मी अनेक रात्री जागल्या आहेत

Saturday, 16 January 2016

कविता # ३५

काळजाला या सवय झाली तुझ्या नावाचा ठोका घेण्याची
चातकासारखे वाट पाहत आहे आता तुझ्या परत येण्याची

Friday, 15 January 2016

कविता # ३४

एकटा जरी असलो तरी तू सोबत असण्याचा भास होतो
दिवसभर सोबत असूनही तूझपासून दूर जाता त्रास होतो

Thursday, 14 January 2016

कविता # ३३

तुझ्यावर असलेलं माझं प्रेम मला शब्दांत मांडता येत नाही
शब्द जरी सापडले तरी त्यातून वाक्य बनवता येत नाही

Wednesday, 13 January 2016

कविता # ३२

हसताना खरंच तू दिसतेस खूप गोड
गालातल्या हसण्याला खळीची जोड

Tuesday, 12 January 2016

कविता # ३१

सांगायचं असतं तुला खूप काही
पण नजरच तुझी सर्व काही सांगून जाते
शब्दांची तर आता गरजच भासत नाही
असे जुळले हृदयाचे हृदयाशी नाते

Monday, 11 January 2016

कविता # ३०

पडायची तशी हौस नाही पण तुझ्या प्रेमात घसरलो
ट्रेन आली विक्रोळीला पण मी उतरायचेच विसरलो

Sunday, 10 January 2016

कविता # २९

हसण्यासाठी मला कोणतेही कारण लागत नाही
तू सुखी रहा याशिवाय काहीही देवाकडे मागत नाही

Saturday, 9 January 2016

कविता # २८

हास्य तुझ्या चेहऱ्यावर सुंदर दिसते अशीच सदैव हसत रहा
कितीही जरी तूला राग आला असेल तरी मला तू प्रेमानेच पहा

Friday, 8 January 2016

कविता # २७

कोणीतरी कुठेतरी हृदयात आपलं होऊन जातं
हृदय मग प्रत्येक गाणं त्या व्यक्तीसाठीच गातं

Thursday, 7 January 2016

कविता # २६

माझ्या मनाला तर चोरलंस तू, या हृदयालाही चोरून जा
प्रत्येक क्षणात तुझी आठवण असतेच, जमलंच तर त्या क्षणांनाही घेऊन जा

Wednesday, 6 January 2016

कविता # २५

पहायला गेलो तर हजारो मुली पाहिल्या असतील
पण खात्रीने सांगतो की त्या तुझ्याइतक्या सुंदर नक्कीच नसतील

Tuesday, 5 January 2016

कविता # २४

उनाड होते हे बावरे मन तू सोबत असताना
सैरावैरा धावून शोधते तुला जवळ तू नसताना

Monday, 4 January 2016

कविता # २३

रातराणीची ती कळी तुझ्यासाठीच फुलली
जेव्हा तुझ्या खळीतली चांदणी तिला दिसली

Sunday, 3 January 2016

कविता # २२

हसताना तुझ्या गालावर एक छान अशी खळी पडते
चांदणीही चंद्राला सोडून त्या खळीत हलकेच दडते

Saturday, 2 January 2016

कविता # २१

तू सोबत असताना वेळ कसा जातो कळतच नाही
कारण त्याक्षणी नजर आणखी कुठे वळतच नाही

Friday, 1 January 2016

कविता # २०

स्वर्गातील अप्सरांहून सुंदर तू नक्कीच दिसतेस
हे मी सतत म्हणत राहीन कारण मला फक्त तूच आवडतेस