Wednesday, 21 October 2015

कविता # ११

तिचा राग पाहायला तसा खूपच शहाणा आहे
रुसलेल्या तिला मनवण्यासाठी तिचा बहाणा आहे

कविता # १०

हृदयात या स्थान नकळतच मिळवलं तिने
मनाला हसण्यासाठी एक नवं कारण दिलं जिने

२ ओळी # १

तू सोबत नसली तरी हृदयाचे धडधडणे थांबणार नाही. पण तू सोबत असताना ज्या तालात धडधडते तो ताल त्या हृदयाला गवसणार नाही.

कविता # ९

कोणीतरी कुठेतरी हृदयात आपलं होऊन जातं
हृदय मग प्रत्येक गाणं त्या व्यक्तीसाठीच गातं

कविता # ८

तुझ्यावर कविता करणे हा माझा आवडता छंद आहे
सुचलेल्या माझ्या प्रत्येक कवितेत तुझ्याच प्रेमाचा गंध आहे